NSE कडून व्याजदर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगच्या कालावधीत वाढ

मुंबई : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) गुरुवारपासून इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हच्या ट्रेडिंग कालावधीत वाढ केली आहे. हा कालावधी सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सद्यस्थितीत अशा प्रकारचे व्यवहार सकाळी नऊ ते दुपारी ३.३० यादरम्यान केले जात होते. आणि बाजारच्या वेळेशी त्याचे समायोजन करण्याचे प्रयत्न NSE ने केले आहेत. त्यापैकी ही एक प्रक्रिया आहे.

व्याज दर व्युत्पन्न (IRD) हा एक आर्थिक व्युत्पन्न करार आहे, ज्याचे मूल्य एक किंवा अधिक व्याज दर, व्याज दर मालमत्तेच्या किमती किंवा व्याज दर निर्देशांकांवरून घेतले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here