नवी दिल्ली : भारतात ब्राझीलचे राजदूत आंद्रे अरन्हा कोरिया डो लागो यांनी सांगितले की, पंजाब आणि हरियाणात पाचट जाळल्याने पूर्ण उत्तर भारतात उच्च स्तरावर वायू प्रदूषण होते. इथेनॉल निर्मिती हा त्याला पर्याय होऊ शकतो.
ते म्हणाले की, पाचट जाळल्यास हवा खराब होते. आंद्रे अरान्हा कोरिया डो लागो यांनी सांगितले की, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी एक उपाय आहे. आणि यासाठी थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोळसा जाळण्यासाठी परिणामकारक बायोमासचा वापर करावा लागेल.
ते म्हणाले की, बायोमासच्या घटकांचा फीडस्टॉकच्या रुपात सहजपणे वापर केला जाऊ शकतो. ते म्हणाले की, इथेनॉल उत्पादन करण्यासाठी अशा घटकांचा वापर हा हवामान बदलाची लढाई लढण्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे.
भारताने आधीच पेट्रोलियम पदार्थांमध्ये इथेनॉल मिश्रण सुरू केले आहे. ब्राझील हे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. यातून पेट्रोलीयम पदार्थांच्या आयातीत खूप बचत झाली आहे. यादरम्यान जहाज आणि विमानांसाठी इथेनॉलचा वापर करण्याबाबत विचार केला जात आहे.