हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
मवाना (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
मवाना साखर कारखान्यातील आणखी एका घोटाळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याची माहिती मिळाल्यावर कारखान्याच्या प्रशासनाने एचआर विभागात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला तेथून हटविले आहे. आता हे प्रकरण दडपण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर, कारखान्याचे अधिकारी या प्रकरणापासून हात झटकत आहेत.
मवाना साखर कारखाना आणि वाद हे समीकरण जुनेच आहे. एक प्रकरण संपत नाही तोपर्यंत दुसऱ्याची सुरुवात झालेली असते. उसाचे पैसे शेतकऱ्यांना देण्याबाबत आधीच कारखाना अडचणीत आला आहे. यातच साखर कारखान्यात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याच्याशी संबंधित लोकांना तुरुंगातही जावे लागले. २०१८ मध्ये उघड झालेल्या घोटाळ्यानंतर कारखाना प्रशासनाने पाच कर्मचाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात घोटाळ्याची फिर्याद दिली. त्याची अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
आतापर्यंत दोनदा घोटाळ्यांचे प्रकार घडूनही कारखान्याच्या प्रशासनाने यापासून काहीच धडा घेतलेला नाही. या घोटाळ्यांपासून सावरणे बाकी असताना, दोन दिवसांपूर्वी आणखी एक प्रकरण समोर आले. आता एचआर विभागातील एका अधिकाऱ्याने घोटाळा केल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकाराची माहिती समजताच कारखाना प्रशासनाने तातडीने संबंधित अधिकाऱ्याला तेथून तातडीने हटविले. हा अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्यात कार्यरत होता. काही वर्षातच तो सेवानिवृत्तही होणार होता असे सांगण्यात येत आहे. कारखाना प्रशासन हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करीत असले तरी कर्चमाऱ्यांमध्ये याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
संबंधित अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांतील वादानंतर नोकरी सोडल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे. घोटाळ्यासारखे कोणतेही प्रकरण नसून एचआर विभागातील अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यात घोटाळ्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे कारखान्याच्या प्रशासनाने सांगितले. मात्र, कारखाना प्रशासनाने या प्रकरणाबाबत अद्याप कोणतेही कायदेशीर पाऊल उचललेले नाही.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp