लुधियाना : केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी घोषणा केली. त्यामुळे बहुतांश कारखान्यांना आपले व्यवस्थापन सुरू ठेवता येणार आहे. काही कारखाने तर बंद होण्याच्या मार्गावर आले होते, त्यांना आधार मिळाला, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
याबाबत द ट्रिब्युनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री अमित शहा यांनी लुधीयानातील राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली. ते म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविताना सरकारने त्यांना २०१६-१७ च्या पूर्वीच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या रक्कमेला खर्च म्हणून मान्यदा दिली. त्यामुळे सुमारे १०,००० कोटी रुपयांचा दिलासा मिळाला आहे.