पलवल : हरियाणा सरकारच्या मालकीच्या सहकारी साखर कारखान्यात गुळाचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही. तर ऊस गळीत हंगाम निम्मा संपला आहे. प्रशासकीय सुत्रांनी सांगितले की, पहिल्यांदाच या वर्षी गुळाचे उत्पादन होईल याची शक्यता नाही. एप्रिल अखेरपर्यंत गळीत हंगाम संपुष्टात येईल अशी शक्यता आहे. हरियाणाच्या सहकार मंत्र्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये पलवल, महम आणि कैथल येथील साखर कारखान्यांमध्ये गूळ उत्पादनाची घोषणा केली होती. मात्र, सुत्रांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांमधील खराब विक्रीमुळे पलवल कारखान्याला जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कारखान्याला २०२२ मध्ये जवळपास १२ लाख रुपयांचा तोटा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कारखान्याने गुळ प्रती किलो ५० रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गेल्या वर्षीची खराब विक्री पाहता यापासून नुकसान सोसावे लागले. मात्र, एका अधिकाऱ्याने दावा केली की गुळ उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आलेले नाही. पलवल कारखान्याने गेल्या वर्षी १७.२६ लाख क्विंटल ऊस गाळप केले होते. कारखान्याने या वर्षी २ डिसेंबरपासून गळीत हंगामास सुरुवात केली आहे. ३२ लाख क्विंटल ऊस गाळपासह एप्रिल अखेरपर्यंत गळीत हंगाम सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.