कर्नाल : गव्हाच्या पिकावर वाढत्या तापमानाचा परिणाम पाहण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने हरियाणा, पंजाब, युपी, एमपी, राजस्थान आणि दिल्लीतील तज्ज्ञांसोबत पिकातील उष्णतेचा परिणाम व्यवस्थापनाबाबत चर्चा केली. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे कृषी आयुक्त डॉ. पी. के सिंह, गहू विकास संचालनालय (डीडब्ल्यूडी) गुरुग्रामचे संचालक डॉ. विपुल श्रीवास्तव, IIWBR चे संचालक डॉ. ज्ञानेंद्र सिंह, माजी सहायक महासंचालक डॉ. रणधीर सिंह आणि इतर तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली.
डॉ. ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, गव्हाच्या पिकाला आवश्यकतेनुसार हळूहळू सिंचन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकरी ०.२ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश १५ दिवसांच्या अंतराने दोनदा अथवा २टक्के पोटॅशियम नायट्रेड १५ दिवसांच्या अंतराने फवारु शकतात. घाबरून जाण्याची ही बाब नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तापमान वाढीमुळे उत्पादन घसरले होते. मात्र, सध्या आयएमडीच्या म्हणण्यानुसार फारशी चिंतेची बाब नाही. पुढील काही दिवसात गरम हवेची शक्यता नाही. ते म्हणाले, आम्ही ११.२ कोटी टन गहू उत्पादनाची अपेक्षा करीत आहोत.
समितीच्या म्हणण्यानुसार, सध्या अधिक तापमान स्थिर झाले आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. हा उतार-चढाव फायदेशीर ठरेल. डॉ. पी. के. सिंह यांनी अशा परिस्थितीत पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे सांगितले. याशिवाय ५० टक्के क्षेत्रातील हवामान बदल शेतीवर झाला आहे. तर ७५ टक्के क्षेत्रात लवकर गहू पेरणी झाल्याने त्यासाठी हे तापमान फायदेशीरच ठरेल. IMD दर मंगळवारी DWD आणि IIWBR ला पिक सल्ला जारी करण्यासाठी साप्ताहिक पुर्वानुमान प्रदान करेल. व्यापक प्रसार आणि जागरुकतेसाठी केव्हीके, शेतकरी उत्पादक संघटना, राज्याच्या कृषी विभागांसह अनेक एजन्सींकडून सल्ला दिला जाईल. डॉ. सिंह म्हणाले की, ते परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.