ब्रिजटाउन : बार्बाडोस ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट कंपनीचे (बीएएमसी) मुख्य कार्यकारी अधिकारी ऑरलँडो एथरेल यांनी सांगितले की, स्थानिक ब्रँडेड पॅकेज्ड साखरेच्या निर्यातीपासून बीडी $४.२ मिलियन (एक बार्बाडोस डॉलर = यूएस $०.५० सेंट) महसूल मिळेल.
एथरेल यांच्या म्हणण्यानुसार, बार्बाडोसने अलिकडेच अमेरिकेला दरवर्षी २,५०० टन पॅकेज्ड साखर विक्री करण्याचा ठेका मिळवला आहे. कृषी मंत्री इंदर वीर यांनी सांगितले की, बार्बाडोसने आपल्या पॅकेज्ड साखर निर्यातीसाठी मिळणाऱ्या किमती जवळपास दुप्पट करण्यात आल्या आहेत. आधी आम्ही जवळपास ९०० बीडी डॉलर प्रती टन साखर विक्री करीत होतो. आता आम्ही जवळपास १,५०० डॉलर ते १७०० डॉलर प्रती टन साखर विक्री करीत आहोत. ते म्हणाले की, आम्ही बार्बाडोस साखरेच्या पॅकेजसोबत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यास सक्षम आहोत. वीर यांनी सांगितले की, आम्ही आता बार्बाडियन ब्रँडिंगसोबत साखरेचे पॅकेजिंग करीत आहोत आणि ही साखर अमेरिकेला निर्यात केली जात आहे. आणि आमच्याकडे आताही युकेला साखर निर्यात करण्याचा पर्याय आहे.