हरदोई : साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन आधीपासून सुरू होते. मात्र, गेल्या दोन वर्षात यामध्ये गती आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण योजनेअंतर्गत याच्या उत्पादनावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. यापैकी हरियावा कारखान्यात दर हंगामात सहा कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले दिली जात आहेत. कारखान्यांनाही ऊर्जा मिळत आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात हरियावां, रुपापूर आणि लोणी येथे साखर कारखाने आहेत. हरियावा कारखाना प्रतीदिन १९० लिटर इथेनॉल उत्पादन करीत आहे. रुपापूर आणि लोणी कारखान्यात इथेनॉल उत्पादनाच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांतून मोलॅसिस हरियावा येथे पाठवला जातो. तेथे इथेनॉल उत्पादन करून त्याची विक्री इंधन कंपन्यांना केली जाते. यातून शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांना सरासरी १० ते १५ दिवसांत बिले दिली जात आहेत. साखरेच्या घाऊक आणि किरकोळ किमती कमी असतानाही हे शक्य झाले आहे. इथेनॉल विक्रीतून कारखाने स्वतः सक्षम होत आहेत. तसेच शेतकऱ्यांनाही नवसंजीवनी देत आहेत.