अल खलीज शुगरकडून क्षमतेच्या केवळ ४०% वर काम

दुबई : अल खलीज शुगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जमाल अल-घुरैर यांनी सांगितले की, कंपनी भारताकडून डंपिंगमुळे केवळ ४० टक्के क्षमतेने काम करीत आहे. अल घुरैर यांनी सांगितले की, जेव्हा भारत डंपिंग बंद करेल, तेव्हा कंपनी आपल्या पूर्ण क्षमतेवर परत येईल. अन्य देशांतील साखर उत्पादकांनी तक्रार केली आहे की, भारताने साखर आणि ऊसासाठी आत्यंतिक देशांतर्गत समर्थन आणि निर्यात अनुदान देवून जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचे उल्लंघन केले आहे. अल-घुरैर यांनी सांगितले की, कमी व्यवस्थापन क्षमतेमुळे अल खलीज शुगरच्या विस्तार योजनांवर परिणाम झाला आहे. कंपनीने स्पेनमध्ये बीट शुगर कारखान्याच्या उभारणीची एक योजना जाहीर केली होती. आणि अल घुरैर यांनी मंगळवारी सांगितले की, ही योजना प्राथमिक टप्प्यात आहे.

डब्ल्यूटीओच्या एका पॅनलने डिसेंबर २०२१ मध्ये ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला यांच्या बाजूने निकाल दिला आणि भारताने जागतिक नियमांचे पालन करावे असे सांगितले आहे. या प्रकरणी भारताने अपिल केले आहे. भारताने चालू हंगामात कारखान्यांना २०२२-२३ मध्ये ६.१ मिलियन टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. गेल्या हंगामातील निर्यात करण्यात आलेल्या उच्चांकी ११ मिलियन टनापेक्षा ही मंजुरी कमी साखरेस आहे. पिकाच्या समस्यांमुळे चालू हंगामात निर्यात आणखी मर्यादीत होईल अशी शक्यता आहे. भारत मुख्यत्वे इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, सुदान, सोमालिया आणि संयुक्त अरब अमिरातला साखर निर्यात करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here