मेरठ : ऊस विकास परिषद आणि आयपीएल साखर कारखाना सकौती यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत ऋतुकालीन ऊस लागणीबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी तज्ज्ञांनी कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन मिळवण्याबाबत माहिती दिली. रासायनिक खतांचा वापर कमी कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत वसंत ऋतुतील ऊस लागवडीच्या पद्धती आणि पंचामृत प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा ऊस अधिकारी दुष्यंत कुमार यांनी शेतकऱ्यांना घरगुती, नैसर्गिक पद्धती अवलंबण्यास सांगितले. यासोबतच रासायनिक खतांचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला. शेतीचा खर्च कमी करून पर्यावरणही सुरक्षित राहिल असे सांगितले. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक अमरप्रताप सिंह, यतेंद्र पवार यांनी माहिती दिली. यावेळी संशोधक डॉ. अवधेश डागर, संजीव रुहेला, आयपीएल कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक दीपेंद्र खोखर, आदेश चौधरी, सत्येंद्र आर्य, नैन सिंह, कुलदिप, रमेश, योगेंद्र, शिवकुमार, योगेश, ओमपाल, प्रेम सिंह, अरुण कुमार, उपेंद्र, सचिन आदी उपस्थित होते.