हवाना : क्युबामध्ये सध्याच्या हंगामामध्ये साखर उत्पादनात निच्चांक गाठल्याचे स्पष्ट झाले आहे. क्युबा सरकारच्या म्हणण्यानुसार, ४,५५,००० टन कच्च्या उत्पादनाचे ऐतिहासिकदृष्ट्या लक्ष्य गाठण्यासाठी साखरेचे उत्पादन होणे अपेक्षीत होते. मात्र, या नियोजनापेक्षा साखर उत्पादन ९५,००० टनाने कमी झाले आहे.
जेव्हा उसाची तोडणी सुरू झाली तेव्हा, ४,००,००० टन देशांतर्गत खपासाठी आणि उर्वरीत साखर निर्यात करण्याची योजना तयार करण्यात आली होती. साखर क्षेत्रातील विश्लेषकांच्या मतानुसार, क्युबा आता देशांतर्गत साखरेचा खप पुर्ण करण्यासाठी साखरेची आयात करेल. याबाबत रॉयटर्सने एकूण साखर उत्पादनाचे अनुमान ३० ते ४० टक्के घसरेल अशी शक्यता व्यक्त केले आहे.