आयएमएफचा पाकिस्तानला मोठा झटका, पाकिस्तानी रुपया निच्चांकी स्थितीत

इस्‍लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कंगाल झालेल्या पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. आयएमएफने चार अटी घातल्या आहेत. त्यांचे पालन केले गेले तर पाकिस्तानला कर्जाचा पुढील हप्ता मिळणार आहे. पाकिस्तानला कर्ज मिळण्यास उशीर होत असल्याने पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत निच्चांकी स्तरावर गेले आहे. गुरुवारी पाकिस्तानी रुपयाची किंमत जवळपास १९ रुपयांनी घसरली. आता एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया २८४,८५ वर पोहोचला आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकार आणि आयएमएफदरम्यान कर्जाबाबत सुरू असलेले मतभेद पाहता कर्ज मिळणे कठीण वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानी रुपयावर दहाव वाढला आहे. यापूर्वी बुधवारी पाकिस्तानी रुपया एक डॉलरच्या तुलनेत २६६.११ वर सुरू होता. आयएमएफ आमच्यासोबत सदस्य नव्हे तर एखाद्या भिकाऱ्यासारखी वागणूक देत असल्याची टीका पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केली होती. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यांचा परकीय चलन साठा ३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. यातून केवळ तीन आठवड्यांची आयात केली जातू शकते. अशा स्थितीत आयएमएफसोबत त्यांची बोलणी सुरू आहेत. यापून पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलरचे नवे कर्ज मिळेल. आणि इतर मित्र देश, सौदी अरेबिया, युएईकडील कर्जाचाही मार्ग मोकळा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here