सलग 12 महिने 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मासिक जीएसटी महसूल जमा

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी (GST) पोटी जमा झालेला एकत्रित महसूल ₹1,49,577 कोटी इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी (CGST) ₹27,662 कोटी, एसजीएसटी (SGST) ₹34,915 कोटी, आयजीएसटी (IGST) ₹75,069 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹35,689 कोटींसह) आणि उपकर ₹11,931 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹792 कोटींसह) आहे.

सरकारने आयजीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी ₹34,770 कोटी सीजीएसटी आणि ₹29,054 कोटी एसजीएसटी ची थकबाकी दिली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी ₹62,432 कोटी आणि SGST साठी ₹63,969 कोटी इतका आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने शिल्लक GST भरपाई पोटी, जून 2022 या महिन्यासाठी ₹16,982 कोटी, तर आधीच्या कालावधीसाठीची AG प्रमाणित आकडेवारी पाठवणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना ₹16,524 कोटी रक्कम जारी केली होती.

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी पोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 12% जास्त आहे, जो रु. 1,33,026 कोटी इतका होता. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयाती द्वारे जमा झालेला महसूल 6% जास्त आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) 15% जास्त आहे.

जीएसटी लागू झाल्यापासून या महिन्यात उपकारा पोटी ₹11,931 कोटी इतका आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा झाला. साधारणपणे, फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना असल्याने, तुलनेने कमी महसूल जमा होतो.

खालील तक्ता चालू वर्षातील एकूण मासिक जीएसटी महसुलाची आकडेवारी दर्शवितो. फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत फेब्रुवारी 2023 मधील जीएसटीची राज्यवार आकडेवारी पुढील तक्ता दर्शवितो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here