नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनटीपीसी)ने एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड-(एनजीइएल) कडे अक्षय ऊर्जा मालमत्ता केली हस्तांतरित

सरकारच्या राष्ट्रीय मुद्रीकरण तत्वाखाली भारतातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनटीपीसी) 28 फेब्रुवारी 2023 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीइएल) ला एका छत्राखाली आणून, अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओ एकत्रित करण्यासाठीचे व्यवहार पूर्ण केले. त्यामुळे एनटीपीसी या राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या मालकीच्या नवीकरणीय/अपारंपरिक/अक्षय ऊर्जा मालमत्ता/ संस्थांचे एनजीइएल कडे हस्तांतरण झाले आहे. उपकंपनीकडे 7 एप्रिल 2022 रोजी पूर्णपणे मालकी आली. व्यवसाय हस्तांतरण कराराद्वारे 15 अक्षय ऊर्जा मालमत्तेचे हस्तांतरण आणि एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (एनआरइएल)कडे समभाग खरेदीद्वारे 100% समभागांचे हस्तांतरण करणे, अशा व्यवहारांचा समावेश आहे. समभाग खरेदी करार 8 जुलै 2022 रोजी अंमलात आला.

या योजनाव्दारे 2032 या आर्थिक वर्षांपर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य साध्य करण्यावर भर देण्यात येणार असून कॉर्पोरेट व्यवसाय योजनेचा एक भाग म्हणून लागू केली आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here