इथेनॉल डायव्हर्शननंतर साखरेमध्ये २८.५ लाख टनांची वाढ

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२२ आणि फेब्रुवारी २०२३ या दरम्यान, इथेनॉल उत्पादनाकडे वळवलेली साखर ऑक्टोबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ यांदरम्यान, वळविण्यात आलेल्या २१.९ लाख टन साखरेच्या तुलनेत २८.५ लाख टनाने अधिक आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनद्वारे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या साखर उत्पादन अपडेटनुसार, या हंगामात ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान ५२८ साखर कारखान्यांनी २५७.६ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. तर गेल्या हंगामात समान कालावधीत २५३ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले. चालू साखर हंगामातील पाच महिन्यांच्या कालावधीत इथेनॉल उत्पादनासाठी २८.५ लाख टन साखर डायव्हर्ट करण्यात आली. गेल्या हंगामातील समान कालावधीच्या तुलनेत ही साखर ३० टक्के अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here