केंद्र सरकार देशातील कामगारांच्या हितासाठी अनेक सामाजिक योजना चालवते. सरकार गरीब घटकांना आर्थिक रूपाने सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि यासाठी ई श्रम कार्ड योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातील कामगार आपली नोंदणी करू शकतात. यासाठी केंद्र सरकारने ई – श्रम पोर्टल तयार केले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये या पोर्टलवर एकूण कामगारांची नोंदणी संख्या २८ कोटींवर पोहोचली आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, ई श्रम पोर्टलवर नोंदणी नंतर कामगारांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळतो. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी कामगारांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्याशिवाय अॅक्टिव्ह मोबाईल क्रमांक आधारला लिंक असणे गरजेचे आहे. याशिवाय बँक अकाउंट आवश्यक आहे. जर एखाद्याच्या आधार क्रमांकाल मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर त्यांनी जवळच्या सीएसएसी केंद्रात संपर्क साधावा, बायोमेट्रिक माध्यमातून नोंदणी करता येते. ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना सरकार दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ देते. कामगारांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचा विम्याचा लाभ मिळतो. केंद्र सरकारच्या रोजगार मंत्रालयाने असंघटीत क्षेत्रातील ३८ कोटी कामगारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.