शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारकडून आता नॅनो डीएपीला मंजुरी

खतांच्या वापरात आत्मनिर्भरता मिळविण्याच्या दिशेना भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारत सरकारने नॅनो युरिया नंतर आता नॅनो डाय अमोनियम फॉस्फेटला (डीएपी) मंजुरी दिली आहे. केंद्रीय केमिल आणि फर्टिलायजर्सचे मंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या ट्विटमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन आत्मनिर्भर भारत अंतर्गत ही सफलता शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभदायक ठरणारी आहे. आता एक पोते डीएपीसुद्धा एक बाटली डीएपीच्या रुपात मिळणार आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने नॅनो युरिया उपलब्ध करुन दिली आहे. कमी किमतीत शेतकऱ्यांना हा युरिया द्रवरुपात उपब्ध होतो. फवारणी करून पिकांना युरिया पुरवठा केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here