भारतीय रेल्वेने फेब्रुवारी 2023 महिन्यात मासिक मालवाहतुकीचा आजवरचा सर्वोत्तम विक्रम प्रस्थापित करत 124.03 मेट्रिक टन मालवाहतूक केली आहे. फेब्रुवारी महिन्यातील वाढीव मालवाहतूक 4.26 मेट्रिक टन इतकी आहे. तर 2022 मधील फेब्रुवारीच्या मालवाहतुकीच्या आकडेवारीपेक्षा यात 3.55 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, सलग 30 महीने मालवाहतुकीत सातत्याने वाढ होण्याचे यशही रेल्वेने संपादन केले आहे.
कोळशाच्या वाहतुकीत, भारतीय रेल्वेने, 3.18 मेट्रिक टन इतकी वाढ नोंदवली आहे. तर त्यापाठोपाठ खते वाहतुकीत 0.94 एमटी, आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीत, 0.66 एमटी तसेच पीओएल वाहतुकीत 0.28 मेट्रिक टन एमटी आणि कंटेनर वाहतुकीत 0.27 मेट्रिक टन वाढ झाली आहे.
वाहन उद्योगाशी संबंधित मालवाहतुकीत झालेली वाढ हे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मालवाहतूक व्यवसायाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 2966 रेकच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत 5015 रेकची मालवाहतूक झाली असून त्यात 69% ची वाढ करण्यात आली आहे.
2021-22 मध्ये 1278.84 मेट्रिक टन वाहतुकीच्या तुलनेत एप्रिल 22 ते फेब्रुवारी 23 पर्यंतची एकत्रित मालवाहतूक 1367.49 मेट्रिक टन इतकी झाली आहे. म्हणजेच या महावाहतुकीत 88.65 मेट्रिक टनांची वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ 6.93% इतकी आहे.
मालवाहतुकीचे अंतर, (निव्वळ टन किलोमीटर्स) देखील 70 अब्ज किमीपासून 73 अब्ज किमी इतके वाढले आहे. यात, 4.28%. ची वाढ झाली आहे. मालवाहतुकीच्या अंतराची वाढ, एप्रिल ते फेब्रुवारी 23 या काळात 82 अब्ज इतकी आहे. आधी ती 74 अब्ज इतकी होती. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 10.81 % इतकी आहे.
ऊर्जा आणि कोळसा मंत्रालयांच्या समन्वयातून, ऊर्जा केंद्रांना कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेचे सातत्यपूर्ण प्रयत्न हेही फेब्रुवारी महिन्यातील मालवाहतुकीच्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पॉवर हाऊसेसमध्ये कोळशाची वाहतूक (देशांतर्गत आणि आयात दोन्ही) जानेवारीमध्ये 3.39 मेट्रिक टननी वाढली आहे 45.63 मेट्रिक टन कोळसा पॉवर हाऊसमध्ये हलविण्यात आला, जो गेल्या वर्षी 42.24 मेट्रिक टन होता, म्हणजेच यात 8.02 % ची वाढ नोंदवली गेली आहे. वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्यांत, भारतीय रेल्वेने 15.44 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वाढीसह, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 79.69 MT पेक्षा जास्त कोळसा पॉवर हाऊसपर्यंत पोहोचवला आहे.
(Source: PIB)