मुरादाबाद : मुरादाबादमधील ठाकूरद्वारमध्ये भारतीय किसान युनियनच्या (भाकियू) कार्यकर्त्यांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियनच्या पंचायत क्षेत्रातील कार्यालयात तालुकाध्यक्ष चौधरी राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर जिल्हा महासचिव घनेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत फेरी काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ऊसाचे समर्थन मूल्य ४५० रुपये प्रती क्विंटल करण्यात यावे, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाच्या आधारावर एमएसपी लागू करावी, विजेची प्रस्तावित १८ ते ३३ टक्के दरवाढ रद्द करावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी हरिराज सिंह, हरकेश सिंह आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.