सरकार देशांतर्गत उत्पादनाचा आढावा घेतल्यानंतरच जादा प्रमाणात साखर निर्यातीला परवानगी देण्याबाबत पुढीव महिन्यात निर्णय घेईल.
याबाबत PTI मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगाम पुढील महिन्यात संपुष्टात येणार आहे. आणि सरकार त्यावेळी उपलब्ध होणाऱ्या अंतिम आकडेवारीचा आढावा घेऊन साखर निर्यातीबाबत आढावा घेईल.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, चालू हंगामामध्ये गेल्या हंगामात चाललेल्या ५१६ कारखान्यांच्या तुलनेत आतापर्यंत ५२८ कारखान्यांनी कामकाज सुरू केले होते. चालू हंगामात आतापर्यंत ६१ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. तर देशात अद्याप ४६७ कारखाने सुरू आहेत. मात्र, गेल्या हंगामात २०२१-२२ मध्ये ३२ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले होते. आणि या तारखेअखेर ४८४ कारखाने सुरू होते. २८ फेब्रुवारीअखेर देशात २५७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.