सितारगंज : येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २५ जानेवारीपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी बिले जमा केली आहेत.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सितारगंज शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचा होळीचा सण गोड करण्याच्या दृष्टीकोनातून पैसे जमा केले आहेत. कारखान्याचे व्यवस्थापक राजीव लोचन शर्मा यांनी सांगितले की, १८ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत गाळप करण्यात आलेल्या १८,२६७ क्विंटल ऊसापोटी शेतकऱ्यांना ऊस समित्यांच्या माध्यमातून ६.३५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामध्ये हल्दानी ऊस समितीला २.७७ कोटी रुपये, सितारगंजला ३.५१ कोटी रुपये आणि खटीमाला ६६ लाख रुपये देण्यात आले आहेत. कारखान्याने आतापर्यंत २०.७८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले असून १.९१ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. एकूण ४४.४६ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. साखर उतारा ९.४१ टक्के इतका आहे.