नवी दिल्ली : भारतातील साखर उद्योग आता परिवर्तनाच्या काळातून जात आहे. कारण अनेकजण इथेनॉल उत्पादनाकडे वळत आहेत. भारत सरकारही इंधनाच्या रुपात इथेनॉल वापराला प्रोत्साहन देत आहे. आणि या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे लाभ दिले जात आहेत. अशाच प्रकारे द्वारिकेश शुगर इंडस्ट्रिजचे, व्यवस्थापकीय संचालक विजय बांका यांनी अलिकडेच सांगितले की, ते इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. यासाठी ते आपल्या साखर उत्पादनात ३० टक्क्यांची कपात करतील.
ते म्हणाले की,आम्ही आमच्या साखर उत्पादनात ३० टक्क्यांची कपात करण्यास सक्षम आहोत. आम्ही जवळपास ४५ लाख क्विंटलच्या ऐतिहासिक साखर उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. आणि आगामी वर्षात आम्ही ३२-३३ लाख क्विंटलपर्यंत कमी येऊ शकतो. बांका यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादनातील हा बदल साखरेच्या तुलनेत इथेनॉलच्या आकर्षक दर निश्चितीमुळे करण्यात आला आहे.
भारत सरकार E२० इंधनाच्या मागणीच्या वाढीमुळे पुढील वर्षासाठी इथेनॉलचा एक कॅरी ओव्हर स्टॉक तयार करण्याची योजना बनवत आहे. सरकारचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे ठेवले आहे. इथेनॉल उत्पादनाचा वापर वाढावा यासाठी केवळ भारतात नव्हे तर जगभरात लक्ष दिले जात आहे. स्वच्छ इंधनाची वाढती मागणी आणि ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्याची गरज, इथेनॉलला जीवाश्म इंधनापेक्षा अधिक टिकाऊ पर्यायाच्या रुपात पाहिले जात आहे. साखर उद्योगासाठी वाढत्या बाजारातील विविधता आणण्याची संधी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
द्वारिकेश शुगर इंडस्ट्रिजने केवळ साखर उत्पादन घटवलेले नाही, तर इथेनॉल निर्यात वाढविण्याची संधीही आहे. कांबा यांनी सांगितले की, निर्यातीमध्ये १ मिलियन टन वाढीची शक्यता आहे. यातून कंपनीला महत्त्वपूर्ण महसूल मिळू शकतो. ते म्हणाले की, १० लाख टन निर्यातीस परवानगी दिली जाईल असे स्पष्ट संकेत आहेत.