प्रत्यक्ष कर संकलनाची 10 मार्च 2023 पर्यंतची तात्पुरती आकडेवारी स्थिर वृद्धी नोंदवत आहे. 10 मार्च 2023 पर्यंत 16.68 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले असून जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील सकल कर संकलनापेक्षा 22.58% अधिक आहे. परतावा वजा करता प्रत्यक्ष कर संकलन, 13.73 लाख कोटी रुपये आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ कर संकलनापेक्षा 16.78% अधिक आहे. हे संकलन एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 96.67% आणि आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण सुधारित अंदाजांच्या 83.19% आहे.
एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने, कॉर्पोरेट प्राप्तिकर (सीआयटी) आणि वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) यामधील वाढीचा दर लक्षात घेता, सीआयटीसाठी वाढीचा दर 18.08% आहे तर पीआयटीसाठी (एसटीटी सह) 27.57% आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, कॉर्पोरेट प्राप्तिकर संकलनामधील निव्वळ वाढ 13.62% आहे आणि वैयक्तिक प्राप्तिकर संकलनामधील 20.73% (केवळ पीआयटी) / 20.06% (एसटीटी सह पीआयटी) इतकी आहे.
1 एप्रिल 2022 ते 10 मार्च 2023 या कालावधीत. 2.95 लाख कोटी रुपये परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 59.44% अधिक आहे.
(Source: PIB)