अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमधील गोंधळ थांबलेला नाही. सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर (एसव्हीबी) आता आणखी एका बँकेला कुलूप लागले आहे. क्रिप्टो फ्रेंडली म्हटल्या जाणाऱ्या सिग्नेचर बँकेला अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आले आहे. या बँकेकडे क्रिप्टो करन्सीचा साठा होता आणि या जोखमीमुळे काही काळ न्युयॉर्कस्थित ही बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर सिग्नेचर बँकेमुळे अमेरिकेमध्ये गोंधळ सुरू असल्याचे बिझनेस टुडेने म्हटले आहे. न्यूयॉर्क स्टेट फायनान्स सर्व्हिस डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सिग्नेचर बँकेला आपल्या नियंत्रणात घेतले आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या बँकिंग इतिहासातील हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बादरा आहे. दोन दिवसांपूर्वी सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्यात आली होती. हे वॉशिग्टन म्युच्युअलनंतर दुसरे मोठे शटडाऊन होते. त्यामुळे आर्थिक संकट अधिक वाढले. आता सिग्नेचर बँकेचा नंबर आला. अमेरिकेतील बँकिंग सेक्टरमध्ये २००८ मध्ये सर्वात मोठे संकट आले हते. तेव्हा लेहमन ब्रदर्सने स्वतःची दिवाळखोरी जाहीर केली होती. त्यानंतर अमेरिकेसह जगभरात अनेक देशांना मंदिला सामोरे जावे लागले आणि अर्थव्यवस्थेचे कणा मोडला होता.