अमरोहा : ऊस राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री संजय सिंह गंगवार सोमवारी तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांच्या कामांचा आढावा घेणार आहेत. आरोग्य केंद्र, रोडवेज बस स्टेशन, अंगणवाडी केंद्र, गोशाला, ऊस समिती, ऊस केंद्रांची ते अचानक पाहणी करतील. याशिवाय ऊस आणि साखर कारखान्याशी संबंधीत अधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस मंत्री संजय सिंह हे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन योजनांचा आढावा घेतील. रात्री चौपाल कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असेल. ऊस राज्यमंत्री सोमवारी दुपारी अमरोहा येथे पोहोचतील. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ते गाठी-भेटी घेणार आहेत. भाजप लोकप्रतिनिधींशी ते चर्चा करतील.