रुडकी : येथील काशीपूर ऊस उत्पादक शेतकरी संस्था तथा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी ऊस पिक लागवडीविषयी माहिती दिली. ऊस संशोधन केंद्र काशीपूरचे संशोधक डॉ. प्रमोद कुमार यांनी सांगितले की, मार्च महिन्यात ऊस लागवडीसाठी सर्वात चांगला कालावधी असतो. या काळात तापमान ऊस लागवडीसाठी अनुकूल असते. त्यामुळे शेत चांगल्या प्रकारे तयार करून त्यामध्ये बियाण्यांवर प्रक्रिया केल्यानंतर ऊस लागवड केली पाहिजे. बियाणे प्रक्रिया केल्यानंतर ऊसाच्या रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासह कीड लागण्याची शक्यताही कमी होते. ऊस लागवडीसाठी बियाणे स्वतंत्रपणे तयार केले पाहिजे. तीन फूट अंतराने ऊस लागवड करावी.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धनौरी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितले की, ऊस लागवडीसाठी शेतांमध्ये पेरणीवेळी दोन्ही बियाण्यांवर प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेताची चांगली नांगरट केल्यानंतर त्यामध्ये कंपोस्ट खते घातली पाहिजेत. यावेळी ऊस विकास अधिकारी प्रदीप कुमार, राजेश कुमार, मुकेश चौधरी, ब्रजमोहन, यशवीर सिंह, मांगेराम, साधु सैनी, सुरेंद्र कुमार, यशपाल सिंह, रमेश पवार, अश्वनी कुमार, सुरेश सैनी, इंद्रेश कुमार, कुलदीप सिंह, संजीव सैनी, मदन सिंह, अमित कुमार, उमेश कुमार, ऋषिपाल, योगेंद्र सिंह आदी उपस्थित होते.