आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलच्या किमतीत दररोज फेरबदल पाहायला मिळत आहेत. त्याच्या आधारावर देशातील विविध राज्यांत पेट्रोल, डिझेलच्या किमती बदलतात. आज, १५ मार्च रोजी सर्व राज्यांनी आपल्याकडील इंधनाच्या किमती अपडेट केल्या आहेत. यामध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात आज, बुधवारी ब्रेंट क्रूड ७८.२९ डॉलर प्रती बॅरल आहे. तर डब्ल्युटीआय क्रूड ७२.१९ डॉलर प्रती बॅरल आहे. कालच्या तुलनेत यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या किमतीत घट आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजतकने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकृत iocl.com वरील माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल.