शाहाबाद : शाहाबाद-मारकंडा येथील शाहाबादा साखर कारखान्याने गेल्या १२० दिवसांत ११.५५ टक्क्याच्या उच्चांकी साखर उताऱ्यासह विक्रमी ५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याने आतापर्यंत ५० लाख क्विंटल उसाचे गाळप केले असून उत्पादित साखरेचे मूल्य १७२ कोटी रुपये असेल असेल सूत्रांनी सांगितले.
ट्रिब्यून ऑनलाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शाहाबाद कारखाना ३८२ गावांच्या २० किलोमीटर परिक्षेत्रात पसरलेल्या ३५ हजार एकर क्षेत्रातील ऊस खरेदी करतो. कारखान्याने चालू हंगामात उच्चांकी १७२ कोटी रुपये किमतीच्या ५ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. मंगळवारी गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये १२० दिवस पूर्ण झाल्याबाबत कार्यकारीसंचालक राजीव प्रसाद यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, कारखान्याने १३ कोटी रुपये किमतीच्या ३ कोटी ३ लाख युनिट विजेची निर्यातही केली आहे.