रुडकी : ऊस विभागाचे अधिकारी, काशीपूर ऊस संशोधन संस्था आणि धानोरी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी मलकापूर गावातील शेतकऱ्यांना ऊसाच्या प्रगत शेतीबाबत प्रशिक्षण दिले. यावेळी शेतकऱ्यांना सुधारित ऊस लागवडीचे प्रशिक्षण दिले.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रमोद कुमार सिंग यांनी सांगितले की, सध्या उसाच्या ०२३८ या लवकर पक्व होणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जातीवर रेड रॉट रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याजागी इतर सुधारित वाणांची लागवड करावी. संस्थेचे प्रशिक्षक राजेश कुमार यांनी ऊस पेरणीच्या योग्य पद्धतीची माहिती सांगितली. उसासह इतर पूरक पिके घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कृषी विज्ञान केंद्र धानोरीचे सहसंचालक डॉ. विनोद कुमार यांनी उसातील कीड व रोग ओळखण्याची लक्षणे व त्यावर उपचार याबाबत माहिती दिली. ऊस परिषदेचे दिग्विजय सिंग, ऊस विकास निरीक्षक समय सिंग, सहाय्यक फलोत्पादन अधिकारी प्रताप सिंग यांनीही शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याचे मार्ग सांगितले. शिबिरात नरेश कुमार, मुन्नू चौधरी, हरपाल सिंग, राजकुमार, कला सिंग, दीपक, सुरेश चौधरी वीरेंद्र सिंग, पंकज, रवी कुमार आदींनी प्रशिक्षण घेतले.