मुंबई : राज्य सरकार गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण मंडळाला १३५ कोटी रुपये निधी देईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
फडणवीस यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय चर्चेवेळी एका उत्तरात ही घोषणा केली. आमदार धनंजय मुंडे यांनी सत्तारुढ पक्षावर बजेटच्या चर्चेवेळी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे योगदान विसरले असल्याची टीका केली होती. आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण मंडळासाठी बजेटमध्ये कमी पैसे दिल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. बजेटच्या चर्चेनंतर उप मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री फडणवीस यांनी सभागृहात निधीची घोषणा केली. फडणवीस यांनी असेही सांगितले की, सरकार छत्रपती सांभजीनगरमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे एक स्मारक उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली की स्मारक उभारणीचे काम सुरू केले जाईल. यादरम्यान धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण मंडळाला निधी देण्याच्या उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेचे स्वागत केले.