इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामात, १५ मार्च २०२३ पर्यंत, गेल्या गळीत हंगामातील ५१६ कारखान्यांच्या तुलनेत ५३० कारखान्यांनी आपले कामकाज सुरू केले होते.
या तारखेअखेर चालू हंगामात १९४ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. तर देशात ३३६ साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. मात्र, गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ७८ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले होते. आणि या तारखेअखेर ४३८ कारखाने सुरू होते.
गेल्या वर्षीच्या तुलेतने यंदाच्या साखर उत्पादनाचा सारंश खाली तालिकेत दिला आहे. तालिकेमध्ये चालू वर्षासोबतच गेल्या वर्षी १५ मार्च २०२३ पर्यंत इथेनॉल उत्पादनासाठी राज्यवार अनुमानीत साखर विचलनही देण्यात आले आहे. अशा प्रकारे ही तालिका दोन वर्षातील साखर उत्पादनाचा स्पष्ट अंदाज देते. आणि इथेनॉल मोडसोबतच आणि त्याच्याविना उत्पादन दर्शविते. खालील सारणी स्वयं-स्पष्टीकरणात्मक आहे.