श्री रेणुका शुगर्सचा हरित ऊर्जा पोर्टफोलिओ वाढविण्यावर भर: अतुल चतुर्वेदी

नवी दिल्ली : SRSL ने हरित ऊर्जेच्या दिशेने मजबूत पावले टाकण्यासाठी पुढील वर्षी इथेनॉल उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची योजना तयार केली आहे, असे विल्मर समुहाची कंपनी श्री रेणुका शुगर्स लिमिटेडचे (SRSL) कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी एका मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, भारतात इथेनॉलची मागणी गगनाला भिडली आहे. आम्ही सद्यस्थितीत सरकारला दरवर्षी २०० मिलियन लिटर इथेनॉल विक्री करीत आहोत. आमच्या महसुलात याचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यातून रोखतेचा प्रवासही निश्चित राहिला आहे. आम्ही FY24 मध्ये उत्पादनात २५ % वाढ करण्याची योजना तयार केली आहे.

२०१८ नंतर सिंगापूरमधील विल्मर कंपनीने आपल्या पूर्वीच्या प्रवर्तकांकडून कर्जात बुडालेल्या श्री रेणुका शुगर्सचे नियंत्रण मिळवले आहे. त्यानंतर कंपनीने 850 कोटी रुपयांच्या अनुमानित गुंतवणुकीसह इथेनॉल उत्पादन क्षमता ५७० किलोलिटर प्रती दिन (केएलपीडी) पासून वाढवून १,२५० केएलपीडी केली आहे. चतुर्वेदी यांनी सांगितले की, जी कंपनी आर्थिक संकटातून जात होती, ती विल्मरच्या रोखड प्रवाहाने बदलली आहे. आता कंपनी श्री रेणुकाचे ६२.५ टक्के शेअर्स नियंत्रित करते. चतुर्वेदी यांनी सांगितले की, महसुलात पुरेशी वाढ होत आहे आणि कंपनी चांगल्या मार्गावर आहे. कंपनीने मधुर शुगर्ससह आपल्या ब्रँडेड साखरेचा व्यवसाय विस्तार करण्यावरही लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मधूर ब्रँड दरवर्षी २० टक्के अधिक दराने वाढ आहे. आणि आमची उत्पादन क्षमता १७० टन हे. कोविडनंतर ग्राहकांचे प्रोफाइल बदलले आहे आणि खुल्या साखरेची खरेदी कमी होत आहे. आम्ही मधूरला एक पॅन इंडिया ब्रँडच्या रुपात विकसित करणे सुरू ठेवू. आणि दरवर्षी २० टक्के वाढ मिळवू. साखर उत्पादनात कंपनी आता कर्नाटक आणि महाराष्ट्राशिवाय, इतर राज्यांत गुंतवणूक करण्याबाबत विचार करीत आहे. कंपनीच्या कांडला आणि हल्दिया येथील दोन साखर रिफायनरी आहेत आणि भारतातील ती साखरेची सर्वात मोठी निर्यातदार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here