अफगाणिस्तानने गव्हाच्या साठवणुकीसाठी संयुक्त राष्ट्रांकडे मागितली मदत

काबूल : वाढत्या दुष्काळाबाबतच्या चिंतेदरम्यान अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रांना (यूएन) गव्हाच्या साठवणूक सुविधेसाठी मदतीची हाक दिली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानद्वारे देशाच्या सत्तेवर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था खूप खराब झाली आहे. आणि तेव्हापासूनच देशातील नागरिक दयनीय अवस्थेत जीवन जगत आहेत. जगभरातील मानवी समुदायांकडून मदत मिळाल्यानंतरही अफगाणिस्तानातील गरीबी, कुपोषण आणि बेरोजगारीचा दर अद्याप सर्वोच्च स्तरावर आहे.

TOLOnews ने अफगाणिस्तानातील कृषी आणि पशुधन मंडळाचे उप प्रमुख मिरवाइज हाजीजादा यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय समुदाय आणि इतर देशांनी सद्यस्थितीत अफगाणिस्तानचे समर्थन करण्याची गरज आहे. अन्न संकटाबाबत कृषी मंत्रालयाचे प्रवक्ते मिसबाहुद्दीन मुस्टिन यांनी सांगितले की, कृषी मंत्रालयाने आपत्कालीन स्थितीसाठी १,००,००० टन गव्हाच्या खरेदीसाठी बजेट निश्चित करण्याचा प्रस्ताव कॅबिनेटला पाठवला आहे.

अफगाणिस्तानच्या स्थितीवर प्रकाश टाकताना विश्लेषक कुतुबुद्दीन याकुबी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानला दरवर्षी जवळपास सहा ते आठ मिलियन टन गव्हाची गरज भासते. सुदैवाने देशांतर्गत उत्पादनातून जवळपास पाच मिलियन मेट्रिक टनाची गरज भागवली जाते. आणि बाकीचा पुरवठा परदेशी स्त्रोतांपासून केला जातो. निम्म्याहून अधिक लोकसंख्येविरोधात सातत्याने केलेल्या भेदभावामुळे देशाच्या रुपात अफगाणिस्तानच्या विकासात अडथळे आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here