वेळेवर करा वसंत ऋतुतील ऊस शेती, मिळेल अधिक उत्पादन

भारतात ऊस हे प्रमुख व्यावसायिक पिक आहे. कारण उसावर विषम परिस्थितीतही फारसा परिणाम होत नाही. याची शेती करणाऱ्यांना फारसे नुकसान सोसावे लागत नाही. ऊस शेती वेळेवर केली तर शेतकऱ्याला चांगला नफा मिळविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ऊस शेती वर्षभर केली जाते. यामध्ये शरद ऋतू, ग्रीष्म ऋतू आणि वसंत ऋतूचा समावेश आहे. सध्या वसंत ऋतू सुरू आहे. अशा काळात जर ऊस शेती केली तर शेतकरी चांगला फायदा मिळवू शकतो.

कृषी जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, ऊस शेतीसाठी २५ ते ३२ डिग्री सेल्सिअस हे उपयुक्त तापमान म्हटले जाते. हे तापमान साधारणतः १५ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या काळात असते. हे पिक तयार होण्यास साधारणतः १० ते १२ महिने आवश्यक असतात. उष्ण कटिबंधातील हवामान या पिकासाठी सर्वात चांगले ठरते. यासोबतच ओलसर हवामान आणि जादा पावसाचीही याला गरज असते. हे पिक दोन ते तीन वर्षे शेतात राहात असल्याने लागणीपूर्वी चांगल्या प्रमाणात खताचा वापर करावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय प्रगत बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. यामध्ये कोसी १३२३५, को १५०२३, कोएल १४२०१, कोशा १७२३१, कोशा १४२३३, कोएस १५२३३ या बिण्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here