मुरादाबाद : मुरादाबादसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकात गहू पक्व होण्यास सुरुवात झाली होती, त्यांचे कमी नुकसान झाले आहे. मात्र, वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी काळजीत आहेत. सरकारने गव्हाचा दर वाढवावा अथवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
न्यूज१८हिंदीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुरादाबादचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह यांनी स्वतः शेतांवर भेटी देवून नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभागाची पथके पाहणी करीत आहेत. कृषी विभागाने जी प्राथमिक माहिती दिली आहे, त्यानुसार सर्वसाधारणपणे १५ ते २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. मात्र, अहवाल आल्यानंतर स्थिती स्पष्ट होईल. मुरादाबाद जिल्ह्यात मुंढापांडे विभागात झालेल्या जोरदार पावसाने
अहमदपूर गावासह आपसापच्या क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.