नवी दिल्ली : गेल्या २४ तासात भारतात नव्या १५९० कोविड १९ रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या ८,६०१ प्रकरणे सक्रीय आहेत. तर या संसर्गातून गेल्या २४ तासात ९१० जण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ४,४१,६२,८३२ वर गेली आहे.
भारताचा, या आजारातून बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९८.७९ टक्के इतका आहे. दैनिक पॉझिटिव्हिटी आणि साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर अनुक्रमे १.३३ टक्के आणि १.२३ टक्के आहे. शनिवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत १,१९,५६० कोविड चाचण्या घेण्यात आल्या आणि आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ९२.०८ कोटींवर पोहोचली आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, भारताने आतापर्यंत २२०.६५ कोटी कोविड-१९ लसीचे डोस (९५.२० कोटी दुसरा डोस आणि २२.८६ कोटी प्रिव्हेन्शन डोस) दिले आहेत. यापैकी ९,४९७ डोस गेल्या २४ तासांत देण्यात आले आहेत. (ANI)