मुरादाबाद : मुरादाबादमधील ठाकूरद्वारामध्ये त्रिवेणी साखर कारखाना राणी नांगलच्यावतीने जटपुरा गावातील शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. व्यंकट रत्नम यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कीड, रोग नियंत्रणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बिकेयूचे तालुकाध्यक्ष चौधरी राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक आनंद सिंह यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उसावरील विविध किडी, रोगांचे नियंत्रण कसे करावे याबाबत कृषी संशोधक डॉ. अविनाश चौहान यांनी माहिती दिली. खोडवा उसावरील रोगांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.