पिलिभीत: सामान्य प्रजातीचा ऊस स्वीकारण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचे रात्रभर आंदोलन

पिलीभीत : पिलीभीतमधील पूरनपुर साखर कारखान्याच्या गेटवर सामान्य प्रजातीचा ऊस असल्याचे कारण देत हा ऊस स्वीकारण्यास नकार दिल्याने रविवारी शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला. शेतकऱ्यांनी ऊसाचे गाळप बंद पाडले. त्यामुळे कारखान्याचे कामकाजही बंद पडले. शेतकऱ्यांनी ऊसाने भरलेले ट्रॅक्टर सर व्यवस्थापकांच्या कक्षासमोर लावले. रात्रभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सोमवारी सकाळी यातून मार्ग काढला नाही तर आसाम हायवेवर चक्काजाम करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. उप जिल्हाधिकारी, जिल्हा ऊस अधिकारी, ऊस अधिकारी कारखान्यात पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. सामान्य प्रजातीचा ऊस स्वीकारला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर शाहजहाँपूरमधून तज्ज्ञांचे पथक बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी केल्यावर कारखान्याच्या गेटवर या उसाची खरेदी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here