Agronex Bio Fuels ची मे २०२३ पर्यंत इथेनॉल युनिटवर काम सुरू करण्याची योजना

गांधीनगर, गुजरात: ॲग्रोनेक्स बायो फ्युएल्स (Agronex Bio Fuels) गुजरातमधील साबर कांथा जिल्ह्यातील शिनावाड गावामध्ये ७५ केएलपीडी (KLPD) क्षमतेची धान्यावर आधारित इथेनॉल (Ethanol) युनिट उभारण्याची योजना तयार करीत आहे.

प्रस्तावित युनिट १९.५५ एकर जमिनीवर स्थापन केली जाईल आणि यामध्ये २.५ मेगावॅट सह वीज उत्पादन प्लांट उभारणीचाही समावेश असेल. नोव्हेंबर २०२२ मध्ये Agronex Bio Fuelsच्या योजनेला पर्यावरण मंजूरी (Environmental clearance/EC) मिळाली आहे. आता कंपनी योजनेसाठी एका ठेकेदार आणि मशीनरी पुरवठादाराच्या निवड प्रक्रियेत व्यस्त आहे. योजनेवर काम मे २०२३ पर्यंत सुरू करेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here