इथेनॉल उत्पादनामुळे उसाची समस्या कायमस्वरूपी सुटणार: सत्यपाल सिंह

बुढाना : शेतकऱ्यांच्या उसाची समस्या इथेनॉल उत्पादनामुळे कायमस्वरुपी सुटू शकते, असे प्रतिपादन बागपतचे भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनी केले. सरकार सबका साथ सबका विकास या तत्त्वाने काम करीत आहे, असे ते म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, ९० टक्के साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देत आहेत. सरकारच्या योजनेनुसार उसापासून इथेनॉल निर्मिती केली जात आहे. इथेनॉल उत्पादनातून शेतकऱ्यांना ऊस बिले देण्याच्या समस्येतून कायमस्वरुपी सुटका करून घेता येईल. सर्व साखर कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देवू शकतात. इथेनॉल उत्पादनामुळे साखर कारखाने व शेतकरी अशा दोन्ही घटकांचा लाभ होईल.

त्यांनी कार्यकर्त्यांना सरकारकडून जनहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. या वेळी बृजपाल सहरावत, मुकेश, दीपक, संजीव, धर्मपाल व प्रदीप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here