Case IH कडून ऊस हार्वेस्टर चालकांना प्रशिक्षणासाठी कार्यक्रमाची सुरुवात

पुणे : सीएनएच इंडस्ट्रिअलचा एक ब्रँड आणि कृषी उपकरणांमध्ये जागतिक अग्रणी केस आयएच (Case IH) ने एक नव्या “प्रगत कौशल्य-ऊस हार्वेस्टर ऑपरेटर प्रशिक्षण” योजनेची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम पूर्ण भारतातील ऊस हार्वेस्टर संचालकांसाठी बारामती (महाराष्ट्र) कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) सहयोगाने सुरू करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश योग्य वापराचे प्रशिक्षम देऊन स्थायी ऊस शेतीला प्रोत्साहन देणे असे आहे. पहिल्या बॅचमध्ये बारामती, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील १५० शेतकरी सहभागी होते. पाच दिवसीय प्रसिक्षण कार्यक्रमात किमान समर्थन शिक्षण योग्यतेकसह १८ ते ३५ वयोगटातील ३०० ऑपरेटर्सना प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले.

सीएनएच इंडस्ट्रियलचे ॲग्रिकल्चर इंडिया सेल्स अँड डेव्हलपमेंट लीडर संदीप गुप्ता यांनी सांगितले की, सीएनएच इंडस्ट्रियलच्या माध्यमातून आम्ही कृषी उद्योगात सकारात्मक परिवर्तनासाठी कटिबद्ध आहोत. प्रगत कौशल्य कार्यक्रमासोबत, आमचे लक्ष्य ऊस हार्वेस्टर वापरकर्त्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्रदान करणे हे आहे. अशीच पद्धती शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे, किमान खर्च आणि अंततः एक स्थायी कृषी प्रणालीसाठी अग्रेसर उपकरणांचे कुशलतापूर्वक संचलन करण्यास सक्षम बनविण्यासाठी आहे.

हा कार्यक्रम विशेष रुपात भारताच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि ऑपरेटर्सना शिक्षित करण्यासाठी कंपनीच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या वर्षी विविध सीएसआर उपाययोजनांच्या हिश्याच्या रुपात कंपनीने आर्थिक साक्षरता, कृषी यांत्रिकीकरण, बायोमास व्यवस्थापन, राज्य कृषी अनुदान अशा विषयांवर हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये ६०० शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे.

Case IH जवळपास ८० वर्षांपासून यांत्रिक ऊस तोडणीमध्ये जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. भारतामध्ये उपलब्ध Austoft ४०१० Maxx ला बेहत्तर तोडणी गुणवत्ता आणि गुणवत्ता उत्पादकतेसाठी तयार करण्यात आले आहे. याच्या हलक्या आणि कॉम्पॅक्ट डिझाइनसोबत ऊस उत्पादकतेला विविध क्षेत्रातील स्थितीमध्ये तोडणीसाठी अधिक लवचिकता मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here