मुंबई : आगामी काळातील मान्सूनबाबत विविध माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात ७ एप्रिलपर्यंत जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता नुकतीच वर्तविण्यात आली होती. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या हवामान विभागाने अपडेट जारी केले आहे. देशभरात गेल्या चार वर्षात २०१९ आणि २०२१ मध्ये जोरदार पावसाने स्थिती बिघडली होती. आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, महाराष्ट्रातही जोरदार पाऊस कोसळला होता. गेल्या वर्षी हवामान विभागाने २०२२ मध्ये ९६ टक्के पावसाा इशारा दिला होता. यावर्षी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, हा पाऊस एल निनो वादळाच्या प्रभावावर अवलंबून असेल.
नवभारतने दिलेल्या वृत्तानुसार, एल निनो गेल्या दोन वर्षांपासून सक्रीय असल्याने पावसावर परिणाम होत आहे. हवामान विभागाने सांगितले की, यावर्षी प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय आहे. त्यामुळे भारतातील मान्सूनच्या स्थितीबाबत चिंता निर्माण झाली आहे. भारतात कोणतीही चिंतेची स्थिती नसेल असेही सांगितले जाते. एल निनोनंतरही यावर्षी ९० टक्क्यांपर्यंत पाऊस कोसळू शकतो. गेल्या तीन वर्षात ला नीनो वादळाचा परिणाम होता. मात्र, या वर्षी एल नीनोचा परिणाम होईल. मे २०२३ पर्यंत एल नीनो तटस्थ, जून -जुलैमध्ये मध्यम आणि ऑगस्टमध्ये थोडा सक्रीय होईल असे सांगण्यात आले.