नवी दिल्ली : सध्याच्या उन्हाळ्याच्या कालावधीत देशांतर्गत खपासाठी पुरेशी साखर उपलब्ध करणे आणि देशांतर्गत दरवाढ रोखण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने मंगळवारी एप्रिल २०२३ या महिन्यासाठी अतिरिक्त २ LMT साखर कोट्याची घोषणा केली. यापू्र्वी एप्रिल महिन्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील ५२५ कारखान्यांसाठी २२ LMT साखर कोटा मंजूर केला होता.
प्रमुख साखर उत्पादक राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये कमी पिकामुळे आणि जेमतेम पुरवठ्यामुळे साखरेच्या दराने उसळी घेतली आहे. एका महिन्यात किमती १५० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढल्या आहेत.
बाजारातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, साखरेच्या किमतीमधील वाढ पाहता केंद्र सरकारने हा खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त कोट्यामुळे मर्यादीत पुरवठ्याचा प्रश्न सुटेल आणि बाजारात किमती स्थिर ठेवण्यास मदत होईल.
Ex-mill Sugar Prices as on April, 11 2023 :
Ex-mill Sugar Prices as on April, 11 2023 :
State |
S/30 [Rates per Quintal] |
M/30 [Rates per Quintal] |
Maharashtra |
₹3400 to 3470 |
₹3550 to 3600 |
Karnataka |
₹3550 to 3575 |
₹3600 to 3625 |
Uttar Pradesh |
|
₹3650 to 3740 |
Gujarat |
₹3481 to 3511 |
₹3551 to 3581 |
Tamil Nadu |
₹3560 to 3600 |
₹3610 to 3650 |
Madhya Pradesh |
₹3600 to 3675 |
₹3650 to 3745 |
Punjab |
₹3725 to 3771 |
|
(All the above rates are excluding GST) |
याबाबतची केंद्र सरकारची अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.