कोळसा मंत्रालयाने 29 मार्च 2023 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या 7व्या फेरीअंतर्गत लिलावासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. 7 व्या फेरीसाठी निश्चित केलेल्या कोळसा खाणींसाठी आज येथे बोलीपूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नामनिर्देशित अधिकारी म्हणून कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव एम. नागराजू होते. या बैठकीला 50 हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 7व्या फेरीत लिलावासाठी एकूण 106 कोळसा खाणी प्रस्तावित आहेत.
यावेळी एसबीआय कॅपिटल मार्केट आणि सीएमपीडीआयएल यांच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. एम नागराजू यांनी बोलीदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशाच्या ऊर्जा सुरक्षेत योगदान देण्याचे आवाहन केले. बोलीदारांना पाठिंबा देण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला, आणि कोळसा खाणींची व्यवहार्यता समजून घेण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची विनंती केली.
(Source: PIB)