शाहाबाद : हरियाणाच्या सहकारी क्षेत्रातील शाहाबाद सहकारी साखर कारखान्याने १० मार्च २०२३ पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या उसाचे १८४ कोटी रुपये म्हणजे ८१ टक्के बिले दिली आहेत. अशी कामगिरी करणारा हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. कारखाना शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यात राज्यात अव्वल ठरला आहे. कारखान्याने सुरुवातीच्या १४९ दिवसांत ६१ लाख क्विंटल उसाचे गाळप करुन २२० कोटी रुपये मूल्याच्या ६ लाख ३० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजीव प्रसाद यांनी सांगितले की, कारखान्याने चालू गळीत हंगामात आजअखेर १६ कोटी रुपयांच्या ४ कोटी ३० लाख युनिट विजेची निर्यात केली आहे. कारखान्याने २०२०-२१, २०२१-२२ आणि चालू हंगाम २०२२-२३ मध्ये १० मार्च २०२३ पर्यंतची सर्व बिले देण्यात आली आहेत. कारखान्याच्यावतीने १० रुपये दराने शेतकऱ्यांना जेवण उपलब्ध करुन देण्यात येते. कारखान्याने आतापर्यंत २९ वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. कारखान्याच्या २० किलोमीटर कार्यक्षेत्रातील ३८० गावांतील शेतकऱ्यांचा ऊस गाळप केला जातो.
यावेळी कारखान्याचे सीए दीपक खतोड उपस्थित होते.