पंजाब: जालंदर पोटनिवडणुकीवर होणार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्यांचा परिणाम

संगरुर : वारंवार आश्वासने देवून आणि आंदोलन करूनही भगवानपुरा साखर कारखान्याने (धुरी) आपल्याकडील थकीत देणी दिलेली नाहीत. त्यामुळे संगरुरमधील शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जालंधरच्या पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवाराला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. ७० गावांतील शेतकरी आपल्या कुटूंबीयांसह जालंधरला जातील. आमचे २० कोटी रुपये कारखान्याकडे थकीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारने आम्हाला वेळेवर ऊस बिले देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप पैसे मिळालेले नाहीत असा आरोप त्यांनी केला. आम्ही पोट निवडणुकीत आपच्या उमेदवाराविरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष हरजीत सिंह बुगरा यांनी सांगितले की, आम्ही सर्व गावांचा दौरा करून सर्व मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दरम्यान, शेतकऱ्यांनी छोट्या – छोट्या समित्या तयार करण्यास सुरुवात केली आहे. आणि समित्यांच्या सदस्यांना प्रचारासाठी विविध गावे निवडून दिली आहेत. ते विविध गावांमध्ये जावून खास पोस्टर तयार करण्यात आले आहेत. काही उत्पादकांनी असेही सांगितले की, आपच्या उमेदवारांच्या रॅलीदरम्यान सरकारविरोधात घोषणाही दिल्या जातील. दर वर्षी ऊसाचे लागवड क्षेत्र कमी कमी होत आहे. २०१७-१८ मध्ये ३,८१० हेक्टर जमिनीवर ऊस लागवड करण्यात आली होती. ते आता घटून २०२१-२२ मध्ये १८९४ हेक्टरवर आले. धुरीचे उपजिल्हाधिकारी अमित गुप्ता यांनी सांगितले की, सरकारकडे आता कोणतीही ऊस बिले थकीत नाहीत. आणि शेतकऱ्यांचे २० कोटी रुपये एका खासगी साखर कारखान्याकडे आहेत. आम्ही याबाबत पाठपुरावा केल्यानंतर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. लवकरात लवकर ऊस बिले दिली जावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here