लाहोर : पंजाबचे कार्यवाहक मुख्यमंत्री मोहसिन नक्वी यांनी साखरेच्या किमतीमधील वाढ आणि साखरेची तस्करी रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यवाहक प्रांतीय सरकारने विभागातील रस्त्यांवरील साखर वाहतुकीवर देखरेख करणे आणि कारखान्यांमध्ये सूची पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत डिलरच्या गोदामांची नोंदणी आणि निरीक्षणासाठी एक तंत्र विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री मोहसिन नक्वी म्हणाले की, किमतीमधील कृत्रीम वाढ रोखण्यासाठी एक कायमस्वरुपी रणनीती तयार करण्याची गरज आहे. दरवाढीबाबत संबंधित विभागांची बेफिकीरी कारणीभूत आहे.
बैठकीत सहभागी झालेल्यांनी सांगितले की, पंजाबमध्ये साखरेचा सरप्लस साठा उपलब्ध आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कमतरता भासण्याची शक्यता नाही. यादरम्यान, गुजरावाला आणि ओकारा जिल्हा बार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी कार्यवाहक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, गुजरावाला जिल्हा तथा सत्र न्यायालयाच्या परिसरात एक ई स्टँप बूथ आणि बँक ऑफ पंजाबचे एटीएम स्थापन केले जाईल. ते म्हणाले की, सरकार गुजरावाला आणि ओकारा येथे वकिलांचे चेंबर स्थापन करण्यासाठीही मदत करेल.