आयटीआर भरण्याचे आहेत अनेक फायदे, कर्ज मिळवण्यातही महत्त्वाची भूमिका

भारतात कर हा सरकारी उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे. आणि याचा एक मोठा हिस्सा इन्कमटॅक्समधून येतो. इन्कम टॅक्स व्यक्तीच्या कमाईवर आकारला जातो. या नियमांतर्गत लोकांना इन्कमटॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात इन्कमटॅक्स विभागाकडून मुदत दिली जाते. त्यापूर्वी करदात्यांना आयटीआर दाखल करावा लागतो.

बहुतांश लोकांना असे वाटते की आयटीआर भरणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र, व्यक्तिगत आयुष्यासाठीही ते खूप महत्त्वाचे आहे. त्याचे अनेक फायदे आहेत.हे फायदे जाणून त्याचा लाभ घेण्यासाठी मुदतीत आयटीआर दाखल करणे गरजेचे आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इन्कमटॅक्स रिटर्न भरणे हे दंड आणि व्याजापासून बचावासाठी महत्त्वाचे आहे. असे न केल्यास ५००० रुपयांपर्यंत दंड होवू शकतो. तो १०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. शिवाय त्यावर व्याज भरावे लागते. इन्कमटॅक्स रिटर्न दाखल केल्यास तुम्ही रिफंडही मागू शकता. जर पीपीएफ आणि किसान विकास पत्र अशा योजनांत गुंतवणूक करत असाल तर ८० सी या अंतर्गत तुम्ही सवलतीस पात्र आहेत. मात्र, मुदतीत आयटीआर भरले तरच ही सवलत मिळते. कर्ज सुविधा मिळविण्यासाठीही आयटीआर महत्वाचे आहे. तुम्ही ऑडिट पासून वाचू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here