नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ५३२ साखर कारखान्यांनी ऊस गळीत हंगामात सहभाग नोंदवला होता. तर गेल्या हंगामात १५ एप्रिलपर्यंत ५१८ कारखआने ऊस गाळप करत होते. समान कालावधीत चालू हंगामात ४०० कारखान्यांनी ऊस गाळप बंद केले आहे. गेल्या हंगामात, २०२१-२२ मध्ये २१३ कारखान्यांनी गाळप बंद केले होते. आणि १५ एप्रिल २०२२ पर्यंत ३०५ कारखाने ऊस गाळप करीत होते.
खाली दिलेल्या तालिकेमध्ये या वर्षाच्या एप्रिलच्या मध्यापर्यंतची स्थिती आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरू असलेले कारखाने, साखर उत्पादन, इथेनॉल डायव्हर्शनची तुलना देण्यात आली आहे.