कृष्णा : सेंटिनी बायोप्रॉडक्ट्स आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गांडेपल्ली गावात २०० केएलपीडी क्षमतेने इथेनॉल उत्पादन करण्यासाठी धान्यावर आधारित डिस्टिलरीची स्थापना करीत आहे. प्रस्तावित युनिट २०.८३ एकर जमिनीवर असेल आणि यामध्ये ४.५ मेगावॅट सह वीज प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे.
कंपनीच्या या प्रोजेक्टला जुलै २०२२ मध्ये पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. आणि हे काम Q४/२०२२ मध्ये सुरू करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार, योजनेचे जवळपास ६० टक्के सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. कंपनीला सप्टेंबर २०२३ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.